परभणी/गंगाखेड(Parbhani) :- अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू (Death)झाल्याची घटना गुरुवार २६ डिसेंबर रोजी पहाटे तालुक्यातील मरडसगाव फाटा परिसरात घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील मरडसगांव येथील गोपीनाथ रंगनाथराव शिंदे (वय ४५ वर्ष) हे गुरुवार २६ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास दूध काढण्यासाठी दुचाकीवरून शेताकडे जात असतांना मरडसगांव फाटा परिसरातील एका हॉटेलसमोर (Hotel)अज्ञात वाहनाने गोपीनाथ रंगनाथराव शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे समजताच त्यांचा चुलत भाऊ विलास देवराव शिंदे, प्रदीप कांबळे आदींनी त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा टाके, अधिपरिचारिका अंकिता कदम आदींनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
मरडसगाव फाटा परिसरात अपघात झाल्याची माहिती समजताच पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जुम्मा खान पठाण, जमादार वाघमारे, पोलीस शिपाई सचिन भदाडे आदींनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय व घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर डॉ. कल्पना घुगे यांनी शवविच्छेदन (Autopsy) करून मृतदेह (dead body) नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मृतक गोपीनाथ रंगनाथराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे.