बार्शिटाकळी(Akola) :- बार्शिटाकळी ते पिंजर रस्त्यावर टिप्पर व अल्टोचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना १६ जून रोजी घडली.
बार्शिटाकळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शिटाकळी ते पिंजर रस्त्यावर रविवार, १६ जून रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रेडवा गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतराच्या परिसरात अल्टो क्रमांक एमएच २७ एच ६८०७ या वाहनातून अरविंद शेषराव गावंडे (५७) राहणार जुने खेतान नगर कौलखेड अकोला हे दोनद येथील आपल्या शेताकडे (Farm)जात असताना पिंजरकडून येणार्या टिप्पर क्रमांक एमएच ३० बीडी ४४८५ क्रमांकाच्या टिप्पर (tipper)चालकाने सदर अल्टो गाडीला जबर धडक (hit)दिली. यामध्ये अरविंद शेषराव गावंडे यांचा जागीच मृत्यू (Death)झाला आहे. या संदर्भात मृतकाचे नातेवाईक प्रवीण सुखदेवराव पाटील यांनी फिर्याद दिली. यावेळी पोलिसांनी टिप्परचे चालक यांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याने भादंवि २७९, २१९ व ३०४ अ असे गुन्हे दाखल केलेले आहेत. सदर टिप्पर चालकाचे नाव शक्ती गोकुळ राठोड अजनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.