पालम शहरातील वैद्य कॉलनीतील घटना
परभणी (Parbhani Burglary Case) : मुलांना भेटण्यासाठी नांदेड येथे गेलेल्या एकाचे घरफोडत चोरट्याने १ लाख ३५ हजार रूपयाची रोकड लंपास केली. ही घटना १४ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ ते १६ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजे दरम्यान पालम शहरातील वैद्य कॉलनी भागात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
गणेश मनोहर पौर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मुलांना भेटण्यासाठी घराला कुलूप लावून नांदेड येथे गेले होते. अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचा दरवाजा कोंडा तोडून घरात प्रवेश करत १ लाख ३५ हजार रूपयाची रोकड लंपास केली. घटनेची माहिती पालम पोलिसांना देण्यात आली. पोनि.थोरात, सपोनि.आर.के.मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुकानातून ५५ हजाराचे साहित्य लंपास
जिंतूर : येलदरी रोडवर असलेल्या रेणूका माता इंजिनिअरींग वर्क शॉप हे दुकान फोडत चोरट्याने दुकानातून ५५ हजार रूपये किंमतीचे साहित्य लंपास केले. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास उघडकीस आली. रोहित प्रभाकर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह राठोड करत आहेत.
विद्युत मोटार लंपास
सेलू : तालुक्यातील रायपूर येथे शेत-शिवारात बसवलेली मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून विद्युत मोटार व इतर साहित्य मिळून ३७ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरटयावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष काकडे यांच्या शेतातून साहित्य चोरीला गेले आहे. त्याच प्रमाणे रामेश्वर गाडेकर यांच्या शेतातील जनरेटर देखील चोरीला गेले आहे. चोरटयांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.