अमरावती सिटीजन फोरम तर्फे परिसंवाद कार्यक्रम
अमरावती (One Nation One Election) : देशात सतत निवडणुका राहिल्या तर देश हिताचे परिणामी कटू निर्णय घेण्यास कोणतेही सरकार समर्थे दाखवणार नाही. त्यामुळे नव्या भारताचे पुढचे पाऊल हे ‘एक देश एक निवडणूक’ (One Nation One Election) असेल असे स्पष्ट मत ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी नोंदवले. तर पहेलगाम हल्ल्यावर प्रकाश टाकताना धर्माधिकारी म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत इस्लामिक दहशतवादापासून भारतालाच नव्हे तर जगाला धोका आहे. तो वेळीच ओळखून अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे असेही त्यांनी अधोरेखित केले.
अविनाश धर्माधिकारी यांची रोखठोक भूमिका
अमरावती सिटीजन फोरम तर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी (ता.02) ‘एक देश एक निवडणूक’ (One Nation One Election) या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, परिसंवादात सहभागी वक्ते ज्येष्ठ सनदी लेखापाल राजेश चांडक, डॉ.किशोर फुले तर विशेष अतिथी म्हणून राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ.अलका कुथे, माजी खासदार अनंतराव गुढे, विचार पिठावर उपस्थित होते.
पाकिस्तान पुरस्कृत इस्लामिक धर्मांधतेपासून जगाला धोका – धर्माधिकारी
एक देश एक निवडणूक, जागतिक दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हान या दोन प्रमुख विषयावर अमरावती सिटीजन फोरम तर्फे परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात बोलताना जेष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, ‘एक देश एक निवडणूक’ याची विस्तृत मांडणी करताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा या ठिकाणी उहापोह करणे आवश्यक आहे. आंबेडकरांचे ज्यावेळी देशाने ऐकले नाही त्यावेळी देशाला देशव्यापी किंमत मोजावी लागली. काश्मीरचे 370 कलम त्यांना नको होते.
भारतीय लोकशाहीचे विलक्षण सौंदर्य अधोरेखित करताना धर्माधिकारी म्हणाले की भारतीय मतदार हा प्रगल्भ आहे. देश परिवर्तनाच्या कालखंडातून जात आहे. जातीय जनगणना हा त्यातील प्रमुख पैलू आहे. सप्टेंबर 2023 रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्यात आलं. ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियम लागू करण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आलं. यातून समाजामध्ये स्त्रीचे स्थान आणि राजकीय दृष्ट्या तिचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पाऊल होते. एक राष्ट्र एक निवडणूक (One Nation One Election) या मुद्द्यावर विरोधकांकडून वैचारिक मांडणी करणे अपेक्षित असताना केवळ बाल्यावस्थेत असलेली भूमिका विरोधकांकडून दुर्दैवाने घेतली जात आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना या देशातील विरोधकांना विरोध करायचा आहे. जो अनाठाई आहे.
राज्यांच्या अधिकारावर गदा येईल, प्रादेशिक पक्षांची अस्मिता धोक्यात येईल ही मांडणी विरोधकांकडून सुरू आहे. ती चुकीची आहे हा उल्लेख करताना धर्माधिकारी यांनी ऑक्टोंबर 1999 मध्ये भाजप सेना सरकारच्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा एकत्रित संदर्भ दिला. कोणती निवडणूक आहे, त्यातील मुद्दे लक्षात घेऊन भारतीय मतदार आपला कौल देतो. कर्नाटक राज्यात झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुका (One Nation One Election) एकत्रित होत असतानाच तेथील मतदारांकडून प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा समतोल साधला. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यान बद्दल बोलताना धर्माधिकारी यांनी स्पष्ट केलं की उत्तर प्रदेशातील विधानसभेचे प्रतिबिंब हे केंद्रातल्या सरकारमध्ये दिसतो. त्यावेळीच्या उत्तर प्रदेशातील निवडणुका लक्षात घेता केंद्राला हे तिन्ही कायदे परत घ्यावे लागले.
म्हणून देश हिताचे कठोर निर्णय सतत निवडणुका राहिल्या तर कोणत्याही सरकारला घेता येणं अशक्य असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रीती राऊत तट्टे, संचालन सुमित राऊत यांनी तर आभार डॉ. पुनम बेलोकार यांनी मानले. कार्यक्रमाला ऍड प्रशांत देशपांडे, डॉ.वसुधा बोंडे, डॉ. जागृती शहा, रश्मी जाजोदिया, डॉ. अविनाश चौधरी, किरण पातुरकर, नितीन गुडधे, संगीता शिंदे, छायाताई दंडाळे, रश्मी नावंदर, पपू पाटील, चरणदास इंगोले, डॉ.विलास कविटकर, मोहन जाजोदिया, बादल कुलकर्णी, बाळासाहेब लोहारे, संजय देशमुख, संजय पाखोडे, गोपाल चंदन, अजिंक्य वानखडे, कर्ण धोटे, सुमित घोम, भूषण बोंडे, रविकिरण वाघमारे, शंतनू बांबल, राजेश डागा, नरेशचंद्र काठोळे, अनिल तरडेजा, यश गवई यांच्यासह अमरावतीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर यांना ठोकून काढलं पाहिजे
छत्रपती शिवरायांचे आपण वारसदार आहोत. कोणतेही लढाई गरम डोक्याने लढायची नसतो, असं सांगत अविनाश धर्माधिकारी म्हणाले संकट आल्यावर अफजलखानाची बोट छाटली गेलीच पाहिजे. शाहिस्तेखाना वरील हल्ला असो की सुरतेची लूट असो ही शिकवण आपल्याला शिवरायांकडून मिळालेली आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले. पहेलगामच्याही मागे चीन असल्याचं आता बोलले जात आहे. त्यामुळे सामर्थ्यशाही लोकशाही म्हणून पुढे जायचं असेल तर यांना ठोकून काढलं पाहिजे आणि नवा भारत ते केल्याशिवाय राहणार नाही, अशीही रोखठोक भूमिका अविनाश धर्माधिकारी यांनी मांडली. तर परिसंवादातील सहभागी वक्ते राजेश चांडक, डॉ.किशोर फुले यांनीही एक देश एक निवडणूक या बाजूने आपल्या भाषणातून कौल दिला. प्रशासकीय व्यवस्था, निवडणुकांवर होणारा खर्च, सुरक्षा यंत्रणांवर येणारा ताण यावर देखील चांडक, फुले यांनी भाष्य केलं.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
रजत श्रीराम पत्रे, जयकुमार शंकरराव आडे यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल व पवन मेश्राम, किरण लढी, मयुरी शिंदे यांनी एमपीएससी परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.