परभणी (Parbhani):- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता एकेरी मार्ग असल्याने या रस्त्यावर सतत वर्दळ असते मात्र स्टेशनकडे जाणार्या एकेरी मार्गावर ढापा कामामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी एकेरी वाहतूकीचा शहरात फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक पोलिसांनी लक्ष्य देण्याची गरज
छत्रपती शिवाजी चौक परिसरातून स्टेशनकडे (Station)जाण्यासाठी कापड बाजार मार्गे गांधी पार्क या रस्त्यावर जागोजागी नालीवरील ढापे तुटले आहेत. ते ढापा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याने सदरील एकेरी मार्गावरून वाहतूक (Transportation)बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकेरी वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना ढापा कामापर्यंत गेल्यानंतर परत यावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरील कामामुळे कापड बाजार परिसरात वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. याकडे शहर वाहतूक विभागाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
फलक न लावल्याने वाहनधारक गोंधळात
कापड बाजारातून स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने रस्त्यावर ढापा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सदरील रस्ता वाहतूकीसाठी बंद केला आहे. मात्र रस्ता बंद केल्याचे सुचना फलक कापड बाजार परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लावणे गरजेचे असतानाही महापालिकेने फलक लावले नसल्याने वाहनधारक, पादचारी नागरीक या एकेरी मार्गावरून जाण्यासाठी वर्दळ करीत आहेत. मात्र पुढे गेल्यानंतर रस्ता काम सुरू असल्याचे लक्षात येताच येथून माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक व पादचार्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेने सदरील रस्त्यावर रस्ता बंद असल्याचे अथवा रस्ता दुरुस्तीचे दर्शन विभागात फलक लावल्यास वाहनधाकर पुढे जाणार नाहीत. मात्र संबंधीतांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.