औंढा नागनाथ (Hingoli) :- औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर औंढा नागनाथ येथील बस स्थानक(Bus stand) परिसरात रस्त्यालगतच्या नालीवर टपरी टाकत वेल्डिंगचे काम करताना अचानक वेल्डिंग मशीनचा वायर नालीत वाहत असलेल्या पाण्यात पडल्याने व सर्वत्र ओलसर असल्याने चार जणांना विजेचा (Shock) गंभीर धक्का लागल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान घडली घटना कळताच लल्ला देव, माधव गोरे व इतरांनी तात्काळ धाव घेऊन लाकडाच्या सहाय्याने वायर बाजूला केला.
औंढा-परभणी रस्त्यावरील औंढा शहराच्या बस स्थानकासमोरील घटना
यादरम्यान पोलीस निरीक्षक जीएस राहिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस, जमादार मोहम्मद शेख,वसीम पठाण, चालक माधव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी सरफराज उर्फ मिनू शेख, शेख फिरोज, जुबेर पठाण, शेख निजाम, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी डॉ सतीश वाकळे प्राथमिक उपचार करून त्यांना हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले यादरम्यान सरफराज उर्फ मिनू शेख वय 30 वर्ष यांचा मृत्यू (death) झाला यादरम्यान घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली यानंतर नागरिकांनी घटनास्थळी व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतल्याने मोठी गर्दी जमा झाली होती.