परभणीच्या न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी न्यायालय मानवत यांचा निकाल
परभणी (Parbhani rape accused Case) : विनयभंगातील आरोपीस न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी न्यायालय मानवत यांनी एक वर्षाचा कारावास, ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता अॅड. प्रविण नवसागर यांनी काम पाहिले. मानवत पोलिस ठाणे हद्दीत जुलै २०२३ मध्ये इरळद या ठिकाणी २९ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अशोक मारोती महाजन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Parbhani rape accused Case) फरार होण्याच्या मागावर असलेल्या या आरोपीस पो.ह. भारत नलावडे व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
सदर प्रकरणात तत्कालीन पो.नि. दिपक दंतुलवार व ठाणेदार संदिप बोरकर यांच्या मार्गदर्शनात पो.ह. भारत नलावडे, विजय लबडे यांनी तपास करत आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. प्रथमश्रेणी न्यायाधीश जी.ए. करजगार यांनी आरोपी अशोक मारोती महाजन याला एक वर्ष कारावास, ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (Parbhani rape accused Case) सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता प्रविण नवसागर यांनी काम पाहिले. न्यायालय अधिक्षक आर.एच. सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. कोर्टपैरवी म्हणुन लक्ष्मण चव्हाण यांनी काम केले.
तासाभरात घेतले होते आरोपीला ताब्यात
मानवत पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होण्याच्या तयारीत असलेला आरोपी अशोक मारोती महाजन याला अवघ्या तासाभरात पोलिस अंमलदार भारत नलावडे, कैलास डुकरे, भारत सावंत, विजय लबडे यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. अवघ्या वर्षभरात या प्रकरणात निकाल आला असून आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.