नाशिक(Nashik):- नाफेडचे दर हे स्थानिक बाजारातील दरांपेक्षा कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाफेड विरुद्ध नाराजी असून, यामुळे आधीच वातावरण तापलेले असताना आता नाफेडचा आणखी एक गैरकारभार (Malpractice) उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांकडून नाहीतर बाजार समितीतून कांदा (Onion) खरेदी केला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकिस आली.
शेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली आहे. मात्र वास्तविक परिस्थिती याउलट आहे. नाफेडचे कांदा दर हे स्थानिक बाजार समितीत मिळणा-या दरांपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड कांदा खरेदी विक्री केंद्राकडे पाठ फिरवली आहे. तर, नाफेडने कांदा खरेदीचे दर हे किमान चार हजार रुपये इतके करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा प्रश्नांबाबत तक्रारी येत होत्या. ऑनलाइन (Online) कांदा खरेदी विक्रीच्या कारभारात गैरव्यवहार (malfeasance)झाल्याचे तपासणी अंती आढळून आले. विक्री झालेल्या मालापेक्षा दुप्पट माल हा गोडाऊनमध्ये असून, ५ ते ६ ठिकाणी असेच चुकीचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. या नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांमध्ये कांदा शेतकऱ्यांकडून नाहीतर बाजार समितीकडून खरेदी केला जात आहे. तर, काही शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जात नसून, दलाली होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच केवळ आधारकार्डवर शिक्के मारुन ऑनलाइन खरेदी विक्रीत गैरप्रकार केल्याचेही आज उघड झाले. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत लवकरच नाशिकमध्ये समिती स्थापन केली जाणार असून, ही समिती नाशिकमध्ये येऊन या संदर्भात आढावा घेणार असल्याचे कळते.
नाफेडकडे शेतकऱ्यांची पाठ
केंद्र सरकारच्या(Central government) बफरस्टॉकसाठी नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जातो. या खरेदी केल्या जाणाऱ्या जाणाऱ्या कांद्याचे दर हे यापूर्वी नाफेडचे स्थानिक अधिकारी ठरवत. मात्र, आता हे दर दिल्लीतून (Delhi)वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे. तर, हे दर आठ दिवसातून बदलले जाणार असून, नाशिकसाठी गुरुवारी हे दर २,८९३ रुपये प्रति क्विंटल इतके करण्यात आले. मात्र, तरीही हे दर स्थानिक बाजार समितीतील दरांपेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत नाफेडकडे पाठ फिरवली आहे.