मानोरा (Washim) :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (CM Laadki Bahin Yojna)लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा, यासाठी नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना माजी जि. प. सदस्या सौ नंदाबाई उकंडराव राठोड यांनी पाठविले आहे.
शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य व सन्मान मिळतो. जिल्हयासह तालुक्यातील अनेक पात्र लाडक्या बहिणींना विविध कारणामुळे या योजनेसाठी अर्ज सादर करता आले नाहीत. तसेच अनेक महिलांचे अर्ज त्रुटीत निघाले होते. त्यामुळे या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यासाठी राज्य शासनाने या योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करुन पात्र वंचित लाडक्या लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री याकडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. नंदाबाई राठोड यांनी विनंती निवेदन पाठवून केली आहे.