परभणी (Parbhani):- शहरातील सुपरमार्केट ते उघडा महादेव मंदिरकडे जाणार्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्ता कामासाठी झाडे तोडली जात आहेत. वन विभाग(forest department) कार्यालया समोरील झाडे मंगळवारी तोडण्यात आली. एकीकडे शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविला जात आहे. तर दुसरी कडे रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याचे दिसत आहे. नव्याने होत असलेल्या रस्त्याच्या बाजुची झाडे तोडली जात आहेत. झाडांचे योग्य संवर्धन करावे, नवीन झाडे (Tree)लावावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरीकांमधून होत आहे.