जिंतूर सेलू मतदारसंघाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सेलूत सभा
परभणी/सेलू (Sharad Pawar) : राज्यासह देशात विरोधकांना राजकारणच करू द्यायचे नाही. त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करून आणि सत्तेचा वापर करून अडचणीत आणायचे असा एक कलमी कार्यक्रम मोदी यांच्या सरकारकडून सुरू आहे. असे वक्तव्य देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांनी सेलू -जिंतूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयराव भांबळे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या नूतन विद्यालयाच्या परिसरातील मैदानावर शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी बोलतांना केले.
उशिराने सुरू झालेली सभा पवार (Sharad Pawar) यांच्या भाषणानंतर दुपारी पाच वाजता संपली. व्यासपीठावर महिलाध्यक्षा फौजिया खान ,जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे, खासदार संजय जाधव, उमेदवार विजयराव भांबळे, हेमंतराव आढळकर,राजेंद्र लहाने, अशोक काकडे ,सुधाकर रोकडे, राम खराबे, अजय चौधरी,संजय साडेगावकर आदी सह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना शरदचंद्रजी पवार म्हणाले की, लोकसभेची निवडणूक अनेक दृष्टीने चांगली झाली.
शिवसेना, काँग्रेस ,आणि राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या एकजूट निर्णायक ठरली. समाजाच्या महत्त्वाच्या घटकाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आपल्या पदरात फारसे काही पडत नाही म्हणून मूलबाळ सोडून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. उत्पादन खर्चाची देखील भरपाई होत नाही. सोयाबीन, कापूस पिकांना भाव नाही याला पर्याय सत्तांतर असून आगामी विधानसभा निवडणुकीत विजयराव भांबळे यांना निवडून दिले पाहिजे. जनता याचबरोबर वाढत्या गुन्हेगारी मुळे त्रस्त आहे.महिला आणि लहान मुली सुरक्षित नाहीत म्हणून राज्यकर्त्यांनी सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही.
जेलच्या भीतीमुळे काहीजण पक्षातून गेले परंतु मतदाराचं आता महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आम्हाला विजयी करतील. त्याचबरोबर आमच्या वतीने देण्यात येणार्या योजनांची माहिती देखील शरद पवार यांनी विस्तृतपणे उपस्थितांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयराव भांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तीस वर्षांपूर्वी झालेले लोअर दुधाना प्रकल्पाचे भूमिपूजन ,१९९६ ला झालेल्या साईबाबा नागरी बँकेचे उद्घाटन माननीय शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाल्याची आठवण यावेळी करुन दिली. खासदार संजय जाधव ,फौजिया खान, विजय गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून नेहमीप्रमाणेच प्रतिस्पर्ध्यावर त्यांनी केलेला विविध प्रकारच्या मुद्द्यावर बोट ठेवले.