गोसे धरणाचे २७ वक्रद्वारे उघडली
कारधा-वैनगंगा नदीपुलावरील वाहतूक बंद
कारधा-वैनगंगा नदीपुलावरील वाहतूक बंद
भंडारा (Bhandara Heavy Rain) : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. दोन दिवसांपासून पावसाची संततधार असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुमसर तालुक्यात दोन रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली तर भंडारा शहरालगतच्या कारधा-वैनगंगा नदीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात तसेच धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने वैनगंगेच्या पात्रातील पाणी पातळी वाढल्याने गोसे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली. (Bhandara Heavy Rain) धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्याचे धरणातील २७ वक्रद्वारे उघडण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात मृग नक्षत्र कोरडा गेल्याने शेतकर्यांची चिंता वाढली होती. शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना आद्रा नक्षत्राच्या प्रारंभापासूनच खर्या अर्थाने (Bhandara Heavy Rain) पावसाला सुरूवात झाली. अशातच गत काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाचा जोर कायम असताना दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकर्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे.
रात्रीपासूनच नियमितपणे पाऊस (Bhandara Heavy Rain) कोसळत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात पाऊस कोसळत असल्याने तुमसर तालुक्यातील दोन रस्त्यावरील पूल पाण्याखाली आल्याने त्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. तर भंडारा लगतच्या कारधा-वैनगंगा पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी (Bhandara Heavy Rain) वैनगंगा नदीला मिळणारे नदीनाल्याच्या पाणी प्रवाहामुळे वैनगंगा नदीतील पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. शेतशिवार जलमग्न झाले आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने गोसे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे २७ वक्रद्वारे उघडण्यात आले असून धरणातून ३०३६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
संभाव्य परिस्थिती लक्षात घेता धरणातून ६००० क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो असा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रातून आवागमन करणार्या नागरिकांना देखील सतर्कतेचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात (Bhandara Heavy Rain) ऑरेंज अलर्ट घोषीत करण्यात आला असून आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तुमसर तालुक्यातील दोन रस्ते बंद
दोन दिवसांपासून तुमसर तालुक्यात कुठे दमदार तर कुठे पावसाची संततधार सुरू असल्याने शेतशिवार जलमग्न झाले असून नदीनाले ओसंडून वाहत आहेत. काही नाल्यांना पूर आला आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी-टेमणी व चुल्हाड-सुकळी नकूल या दोन रस्त्यावरील (Bhandara Heavy Rain) पूल पाण्याखाली आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे. शेतकर्यांना नाल्यापलीकडील शेतात जाण्यास अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.