संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे बच्चू कडू कडे साकडे!
मानोरा (Orange Farmers Protest) : तालुक्यातील फळबाग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अवकाळी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या संत्रा बागांची हेक्टरी 32,500 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती, त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व पीकविमा शासनाकडून मिळवून द्यावा, याकरिता कारखेडा येथे माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संवाद साधून साकडे घातले.
यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर संत्रा बागांमध्ये नव्या फुटीला सुरुवात झाली. मात्र, जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने फुलांच्या आणि लहान फळांच्या गळतीचे प्रमाण शंभर टक्क्यांवर झाले, त्याचबरोबर अतिवृष्टी पावसामुळे तालुक्यातील संत्रा बागांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
सध्या शेतकऱ्यांवर हलाकीची वेळ आली आहे. मानोरा तालुक्यातील संत्रा बागेची फळबाग शास्त्रज्ञ व कृषी विभाग यांनी पाहणी करून म संत्रा बागेचा नुकसानीचा अहवाल शासनाकडे दिला आहे.
करखेडा येथील संवाद संपूर्ण कर्जमुक्ती मेळाव्यात शेतकऱ्यांनी मांडली व्यथा!
कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार सइताई डहाके यांनी पावसाळी अधिवेशनात मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मागितली. त्याचबरोबर संत्रा फळबाग शेतकऱ्यांनी यावर्षी मृग बहार संत्राचा पिक विमा काढला असून पिक विमा कंपनीकडून सुद्धा फळबाग संत्राची पाहणी झालेली आहे. फळबाग शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळीही सुद्धा अंधारात गेली. याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत संत्राचे झाडे जाळून आंदोलन केले. सध्या संत्रा झाडांना एक संत्राचे फळ सुद्धा खाण्याकरिता मिळत नाही एवढी मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मानोरा तालुका येथील फळबाग शेतकऱ्यांनी मागील जून महिन्यापासून निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे वारंवार मागणी केली असून शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, त्यामुळे मानोरा तालुक्यातील फळबाग शेतकरी पूर्णपणे हावालदिल झाला असून घरखर्च कसा चालवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने संत्रा फळबागेला हेक्टरी ३२ हजार ५०० रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.
मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 32500 रुपये मदत तात्काळ मिळावी, मृग बहार संत्रा पिकाचा तात्काळ पिक विमा कंपनीकडून मिळवून द्यावा व याकरिता माजी मंत्री प्रहार पक्ष नेते बच्चू कडू शेतकरी संवाद दरम्यान त्यांची भेट घेऊन निवेदन देत संवाद साधला. यावेळी संत्रा उत्पादक शेतकरी विशाल ठाकरे, मुकेश काळे, प्रदीप मिसाळ, दामोदर भोयर, घनश्याम मिसाळ, शुभम मिसाळ, एकनाथ कोल्हे, प्रशांत धोत्रे, नितेश लवट व इतर शेतकरी उपस्थित होते.




