– अवकाळी पावसाचा मृग बहराला फटका
– पिकविम्याची नुकसान भरपाई मिळेना
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Wardha ) :- शासनाकडुन पीकविमा ( Crop insurance ) काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. मात्र, हवामानावर आधारित फळपीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना ( farmers ) विमा कंपनीकडुन नुकसानीनंतरही मदत दिल्या गेली नाही. त्यामुळे कारंजा, आष्टी, आर्वी तालुक्यातील अनेक संत्रा उत्पादक ( Orange growers ) शेतकरी संकटात आले. सतत अवकाळी पावाची हजेरी लागत असल्याने मृग बहर फुटणार की नाही ही चिंता निर्माण झाली. या पीकविमा कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्याच्या कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक आहेत. या शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचे मृग बहर व आंबीया बहर आल्यावर लगेच फळ पीक विमा काढण्यात येतो. नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आर्थिक मदत मिळावी, याकरीता अभिनव उपयोगात येईल, असे गृहित धरून अनेक शेतकऱ्यांनी विमा काढून ठेवला होता.
– कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक आहेत.
२०२२- २३ या एका मागे एक आलेल्याा नैसर्गिक आपत्तीने ( natural disaster ) मृग बहर व आंबीया बहर या दोन्ही बहराचे नुकसान केले. विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागासह विमा कंपनीला याबाबतची सूचना दिली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्याक्ष बागांमध्ये योऊन संपूर्ण विकाची पाहणी केली. झाडावरून खाली आलेल्या फळांचा सडा तपासाला पण, विम्याचा लाभ मिळालेला नाही. आर्वी तालुक्यातील ( Arvi Taluka ) यावर्षी मोठ्या प्रमाणात अनेक संत्रा भागांमध्ये गारपिटीमुळे संत्रा बागांचे नुकसान झाले आहे. त्याबातच्या ही तक्रारी करण्यात आल्या. विमा कंपनीने कोणतीही दाखल घेतलेली नाही. ‘त्या कंपनीवर कारवाई करा कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक आहेत. दरवर्षी शासनाकडुन पीकविमा (Crop insurance from Govt ) काढण्याची शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात असल्यामुळे शेतकरही पिकविमा काढतात. मात्र, दरवर्षी निसर्गाच्या संकटामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यात पिकविमा कंपनीकडुन सर्वेक्षण करण्यात येते. मात्र, नुकसान भरपाई देण्यात येत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. पीकविमा कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.