मानोरा (Washim):- माहे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेला सततचा पाऊस (Rain)व २ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे संत्रा(Orange), मोसंबी व फळपिकांचेही अतोनात नुकसान झाल्यामुळे नुकसानीचा पंचनामे करून शासनाची आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन पालकमंत्री ना संजय राठोड यांना पंचायत समितीचे माजी सदस्य तथा धामणी मानोरा येथील प्रगतशील शेतकरी (Farmer)प्रविण प्रविण धोटे यांनी केली आहे.
नदी नाल्याना पूर येऊन झालेल्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा
पाठविलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे की, मानोरा तालुक्यात २ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमूळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान व नदी नाल्याना पूर येऊन झालेल्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा ग्राम सेवक व कृषि सहायक यांना करण्याचा आदेश महसूल स्तरावरून देण्यात आलेला आहे. यामधून फळबाग व भाजीपाला पिक उत्पादक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू उत्पादकासह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभागाला आपल्या स्तरावरून देण्यात येण्याची मागणी शेतकरी धोटे यांनी पालकमंत्री(Guardian Minister) याजकडे केली आहे.