तीन ठिकाणी रंगणार स्पर्धा
गोंदिया (Police Sports Competition) : नागपूर परिक्षेत्रीय पोलिस क्रिडा स्पर्धा-२०२४ चे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार असून स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकूलासह जिल्हा क्रीडा संकूल व कारंजा येथील पोलिस कवायत मैदानावर स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत गोंदिया, भंडारा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, आणि वर्धा जिल्ह्यांतील पोलीस खेळाडूच्या ६ संघ सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील (Police Sports Competition) पोलीस अधिकारी- अंमलदार यांच्या अंगी खेळाडू वृत्ती जोपासली जावी, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा, पोलीस म्हणुन दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना निर्माण होणार्या अडी-अडचणी सततचा ताण तणावातून काहीशी विश्रांती मिळावी, ताण-तणाव कमी व्हावा, पोलीस दलातील अधिकारी-अंमलदार यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ निरोगी आणि चांगले राहावे या संकल्पनेतून परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी सदर स्पर्धा गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. (Police Sports Competition) स्पर्धेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग- गोंदिया, आमगाव, तिरोडा, देवरी तसेच पोलीस उप-अधीक्षक (गृह), रापोनि पो. मु. गोंदिया यांचे नियंत्रणात संपुर्ण आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून पोलीसांचे मनोबल वाढविण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धांचा समावेश
पोलिस विभागीय (Police Sports Competition) क्रीडा स्पर्धेत फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, बास्केटबॉल (पुरुष/महीला), कब्बडी (पुरुष/महीला), व्हॉलीबॉल (पुरुष/महीला), खो – खो (पुरुष/महीला), बॉक्सिंग, (पुरुष/महीला), कुस्ती, (पुरुष/महीला), तायक्वांडो, (पुरुष / महीला), वु-शु, (पुरुष / महीला), तसेच वैयक्तिक क्रिडा प्रकारात- अॅथलेटिक्स, (पुरुष/महीला), ज्युडो (पुरुष/महीला), वेटलिफ्टिंग, (पुरुष/महीला), पावरलिफ्टिंग (पुरुष/महीला), इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.