स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा अभिनेते भारत गणेशपुरे आणि रंजनाताई मामर्डे यांना सन्मानित करण्यात येणार
अमरावती () : दरवर्षीप्रमाणे यंदाही चिखलदरा येथे गाविलगड शौर्यदिन व मातृवंदना कार्यक्रमाचे औचित्य साधून मेळघाट परिषदेचे (Melghat Parishad) आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांना वऱ्हाड भूषण तर विदर्भ आंदोलन समितीच्या अध्वर्यू रंजनाताई मामर्डे यांना विदर्भ वीरांगना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
किल्ले गाविलगड येथे होणाऱ्या या (Melghat Parishad) सोहळ्यातील शौर्य दिन व मातृवंदना कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली किल्लेदार राजा भैय्या ठाकूर व प्रदीपसिंह ठाकुर यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.उद्घाटक म्हणून अभिनेते भारत गणेशपुरे,प्रमुख वक्ते किशोर वानखडे,प्रमुख पाहुणे डॉ.के.एम.कुलकर्णी, खासदार डॉ.अनिल बोंडे,आमदार केवलराम काळे, प्राचार्य शक्तीसिंह राजपूत,माजी आमदार जगदीश गुप्ता,चिखलदरा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी,भारतीय विद्यामंदिर अमरावतीचे सरचिटणीस अनंतराव सोमवंशी, नगरपरिषद चिखलदऱ्याचे माजी उपाध्यक्ष अब्दुल शेख,अरुण तायडे,अविनाश कोठाळे,संभाजीनगर येथील उद्योजक अशोक चिनागी,नलिनीताई चिनागी,राजेंद्र गोरले,समाजसेवक चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या (Melghat Parishad) प्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सेवावृत्तींचा स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारे सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या मध्ये सुप्रसिद्ध नुरोलोजीस्ट डॉ. सिकंदर अडवाणी,बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्रामीण क्षेत्राचे चेअरमन मिलिंद घारड, महात्मा गांधी संशोधन केंद्र संशोधन केंद्र वर्धा येथील संचालक दीपकुमार वर्मा,डोमटेक आर्ट प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे संचालक सुनील काळे, मोर्शी येथील उत्कृष्ट शेतकरी गजानन बारबुद्धे, जैतादेही जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र राठी,साई कोचिंग क्लासेसचे संचालक दिलीप हटवार,माहेर फाउंडेशनच्या संचालिका दीपाताई तायडे,ग्रामोद्धार सेवाव्रती दिलीप ठाकरे, राजर्षी शाहू महाराज वाचनालयाचे संचालक राहुल घडांगे,संत गाडगेबाबा अमरावती इतिहास मंडळ अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष बनसोड,सिने दिग्दर्शक अनुराग दळवी,हर्षदा स्कूल ऑफ क्लासिकल डान्सच्या संचालिका सौ.हर्षदा पनके,राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष निलेश जामठे,दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी किशोर मेटे,शांतनू डाहे (पोलवॉल्ट) आणि निषाद शेख (लॉन टेनिस) यांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सोबतच जाणीव फाउंडेशन धामणगाव गडी या संस्थेस उत्कृष्ट पर्यावरण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सातपुड्याच्या कुशीतील मेळघाटच्या परिपूर्ण परिसंस्थेशी निगडित पर्यावरण,वनसंपदा,प्राणी विश्व,आदीम संस्कृती,बोलीभाषा,शेती,इतिहास इत्यादी विषयांवर मेळघाट परिषदचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेत प्रसिद्ध साहित्यिक अशोक मानकर,प्रा.डॉ.संतोष बनसोड, प्रा.डॉ.काशिनाथ बऱ्हाटे,प्रा.डॉ.गोविंद तिरमनवार, प्राचार्य डॉ.एकनाथ तट्टे,सतीश झामरे या तज्ज्ञांचे विविध विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.
१४ डिसेंबर २०२४ रोजी गाविलगड पायथ्याशी असलेल्या बागलिंगा चौकी येथून प्रा. राजाभाऊ महाजन, यशवंत काळे, पंकज वैद्य, राजा धर्माधिकारी विशाखा खडके,अंजली जवांजाळ, अपूर्वा सोनार,जयकुमार चर्जन,ईशान जेठाणी, गणेशराव हिंगनिकर,कैलास पेंढारकर,रवींद्र मालठाने,दिनेश चोरे व राजेंद्र गोरले यांच्या उपस्थितीत गडचढाई मोहिम सुरू करण्यात येईल. त्यानंतर गडस्वच्छता,ऐतिहासिक वास्तूंची साफई आणि इतिहास तज्ज्ञ विवेक चांदुरकर,प्रतीक पाथरे, संघर्ष सावरकर यांच्याद्वारे इतिहास जागर करण्यात येईल.सायंकाळच्या सत्रात विदर्भाच्या स्वरसम्राज्ञी श्रीमती रंजनाताई मामर्डे,गायक विक्रम मामर्डे म्युझिक फॅन्स क्लबचे परतड्याचे संचालक राजा ठाकूर,बहारदार संगीत मैफिल आयोजीत करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, गिरीजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निंभेकर यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. शौर्य दिनाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पाथरे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल रुईकर सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मावळे अथक परिश्रम घेत आहेत.