परभणी (Parbhani) :- संपत्तीच्या वादात मोठा भाऊ लहान भावाचा वैरी झाला. अंगावर ट्रॅक्टर (Tractor)घालत लहान भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. न्यायासाठी दैठणा पोलीसांकडे धाव घेतली. मात्र तेथेही न्याय न मिळाल्याने जखमी लहान भावाने सोमवार २० जानेवारीला पोलीस अधिक्षकांकडे निवेदन दिले. न्याय द्या, अन्यथा परिवारासह आत्मदहनाची (self-immolation) परवानगी द्या, अशी मागणी तक्रारदार विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांनी केली.
संपत्तीच्या वादात भावाच्या अंगावर घातला ट्रॅक्टर
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल वाघ यांची वडिलोपार्जीत पोखर्णी नृ.येथे संपत्ती आहे. त्यांचा मोठा भाऊ गुलाब ज्ञानोबा वाघ हा शेती वहिती करू देत नाही. यातच त्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये विठ्ठल वाघ यांना खोर्याच्या तुंब्याने मारून जखमी केले. सदर प्रकरणात दैठणा पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. तपासात आरोपीलाच मदत केले. यात मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा गावात आहे. कारवाई न झाल्याने गुलाब वाघ यांचे मनोबल वाढले. त्याने विठ्ठल वाघ यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याही प्रकरणात दैठणा पोलीसांनी गुन्हा नोंदविला नाही. तसेच आरोपीलाही अटक केली नाही.
आर्थिक देवाण घेवाण करत दैठणा पोलीस मॅनेज होत असल्याने विठ्ठल वाघ यांनी शिवसेना युवती जिल्हा प्रमुख प्रिती ज्ञानेश्वर घुले पाटील यांच्या मदतीने पोलीस अधिक्षकांकडे निवेदन सादर करत न्यायाची मागणी केली आहे.