Kerala (केरळ):- केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन(Landslide) झाले, ज्यात 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकांची सुटका केली जात आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) सांगितले की, बाधित भागात अग्निशमन दल (fire brigade)आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.
आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियानाने एक नियंत्रण कक्ष उघडला आहे
एनडीआरएफची अतिरिक्त टीम वायनाडला जाणार आहे. क्षेत्राच्या सीएमओनुसार, आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियानाने एक नियंत्रण कक्ष (control room) उघडला आहे आणि आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 9656938689 आणि 8086010833 जारी केले आहेत. घटनास्थळी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर(helicopter) तैनात करण्यात आली आहेत. केरळमधील व्यथिरी, कालापट्टा, मेप्पडी आणि मानंतवाडी रुग्णालयांसह सर्व रुग्णालये(Hospital) तयार आहेत. सर्व आरोग्य कर्मचारी रात्रीच सेवेसाठी दाखल झाले होते. वायनाडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची (Health workers) आणखी पथके तैनात करण्यात येणार आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.