नागपूर(Nagpur) :- हॉटेलमधील खोलीत युवकाने बळजबरीने तिच्यावर अत्याचार (torture)केला. त्यावरून उद्भवलेल्या वादात दोघात ‘फ्रिस्टाईल’ झाली. यावेळी झटापटीत चाकूचे वार युवकाच्या गळ्यासह हातावर झाले. तर युवतीच्या अंगावर चाकूसह ओरबाडल्याच्या जखमा झाल्या. यावेळी युवतीचे रौद्ररूप बघून घाबरलेला युवक अर्धनग्न (half naked)अवस्थेत जीव वाचवित कार घेऊन पसार झाला. ही खळबळजनक घटना गणेशपेठ हद्दीतील घाटरोडवरील ओयो (silver Nest) हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या ५ च्या सुमारास घडली. तत्पूर्वी दोघांनीही एमडी (MD) घेतल्याचे बोलले जाते.
तरुणीच्या चाकू हल्ल्यात युवक किरकोळ जखमी
अनिकेत अशोक देडगे, रा. रामबाग, असे जखमी युवकाचे नाव आहे. तो प्रताप नगर येथील सावजी हॉटेलमध्ये काउंटरवर काम करतो. तर पीडित युवती ही २१ वर्षीय असून मूळची चंद्रपूरची (Chandrapur)आहे. ती नागपुरात भाड्याने राहत असून नीटची(NEET) तयारी करीत असल्याचे सांगितले जाते. या युवतीशी एका मित्रामार्फत ओळख झाली. अनिकेतने गुरुवारी युवतीला भेटायला बोलाविले. अनिकेतच्या कारने दोघेही शहरात फिरून रात्रीला घाटरोडवरील हॉटेलमध्ये पोहोचले. खोलीत गेल्या गेल्याच अनिकेतने तिच्यावर बळजबरीने अत्याचार (torture)केला. थोडावेळ आराम केल्यानंतर सिगारेट पिण्याकरिता दोघेही पहाटेला ४ च्या सुमारास बाहेर पडले.
संतप्त युवती आणि अनिकेतमध्ये अचानक वाद उद्भवला
मेडिकल चौकातून सिगारेट व हेल्थ ड्रिंक घेऊन ५ च्या सुमारास हॉटेलमध्ये आले आणि पुन्हा अनिकेतने बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे संतप्त युवती आणि अनिकेतमध्ये अचानक वाद उद्भवला. ‘फ्रिस्टाईल’ दरम्यान चाकू निघाला. झटापटीत चाकू (Knief) युवकाच्या हाताला व गळ्याजवळ लागल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी युवतीच्या मते, युवकाने बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे उद्भवलेल्या वादात झटापट झाली आणि प्रतिकारात चाकू युवकाला लागला. गळ्यावर व हातावर चाकूचे वार बघून युवक अर्धनग्न अवस्थेत खोलीतून पळत बाहेर पडला. झटापटीत युवतीच्या शरीरावरही चाकूसह ओरबाडल्याच्या जखमा आहे. घटनेची माहिती मिळताच गणेश पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले, याप्रकरणी पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध अत्याचाराचा तर युवकाच्या तक्रारीवरून युवतीवर हल्ल्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीही दोघेही लाँग ड्राईव्हवर गेले होते. त्यामुळे दोघात आनंददायी मैत्रीपूर्ण संबंध (Relation)निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघांत हॉटेलच्या खोलीत बिनसले. यावेळी चाकू निघाला. दोघेही जखमी झाले. शुक्रवारी पोलिसांनी दोघांचीही वैद्यकीय तपासणी(Medical Inspection) केली.