अर्जुनी मोर (Gondia):- गोंदिया, भंडारा(Bhandara),चंद्रपूर(chandrapur), गडचिरोली(Gadchiroli), धान उत्पादक जिल्हे असून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान पीक घेतले जाते. येथील अर्थव्यवस्था (economy) धानपिकावर अवलंबून आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त (Naxalite) अतिदुर्गम तालुका म्हणून अर्जुनी मोर तालुक्याला ओळखला जातो या तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून धनाची रोवनीला सुरुवात झाली. एक महिन्यापासून मजुरीने तसेच हुंडा पद्धतीने शेतकरी (Farmer)शेतातली रोहिणी करून घेतात. अशातच चान्ना येतील शेतकरी अशोक रामकृष्ण लोगडे यांच्या शेतातील या परीसरातील शेवटचा रोवना गावातील असल्याचे मजुरांकडून बोलल्या जात होते. आनंद उत्सवात पुरुष वेश धारण करून महिला अशोक रामकृष्ण लोखंडे यांच्या शेतात रोवणीचे गाणे म्हणून होती.