खैबर पख्तूनख्वा (PAK Terrorists Encounter) : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराच्या कॅप्टनसह 10 दहशतवादी ठार झाले. (PAK Terrorists Encounter) पाकिस्तानी लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे, डेरा इस्माईल खानमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली.
या (PAK Terrorists Encounter) चकमकीदरम्यान, कॅप्टन हसनैन अख्तरने (Khyber Pakhtunkhwa) आपल्या संघाचे नेतृत्व केले आणि शौर्याने लढताना ते शहीद झाले. या चकमकीत 10 दहशतवादी जागीच ठार झाले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. (ISPR) आयएसपीआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हसनैन अख्तर हे एक धाडसी अधिकारी होते, ज्यांनी यापूर्वीही अनेक ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्या
2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर (PAK Terrorists Encounter) पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बहुतेक दहशतवादी हल्ले खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात झाले आहेत. जानेवारी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये 74 दहशतवादी हल्ले झाले, ज्यात 91 लोक मृत्युमुखी पडले आणि 117 जण जखमी झाले. बहुतेक हल्ले (Khyber Pakhtunkhwa) खैबर पख्तूनख्वामध्ये झाले आणि त्यानंतर बलुचिस्तानचा क्रमांक लागतो.
पाकिस्तान सरकारचे मोठे विधान?
सरकार आणि लष्कर दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा दावा करतात. सुरक्षा दलांचे म्हणणे आहे की, ते दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करत राहतील. तथापि, (PAK Terrorists Encounter) पाकिस्तानमध्ये सतत वाढणाऱ्या दहशतवादी घटनांवरून असे दिसून येते की, सरकार आणि लष्कर आतापर्यंत हे हल्ले थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सातत्याने वाढत आहेत.
पाकिस्तानी सैन्य दहशतवादाविरुद्ध कारवाया करत आहे, परंतु तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानचे सुरक्षा आव्हान अधिक गंभीर झाले आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्करासमोर आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे, या (PAK Terrorists Encounter) दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवणे, जेणेकरून देशात स्थिरता ठेवता येणार आहे.