लाहोर (Pakistan Pok) : पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. (Pakistan Pok) पाकिस्तान सरकारच्या विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. माहितीनुसार, या निदर्शनात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Pakistan Pok) पीओकेमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. नुकत्याच निवडून आलेल्या सरकारपुढे हे मोठे आव्हान बनले आहे. किंबहुना रेशन, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, त्याच्या निषेधार्थ लोक संपावर आहेत.
Pok मध्ये परिस्थिती बिघडली
या भागातील व्यापाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त अवामी कृती समितीच्या 70 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर येथे हिंसाचार उसळला. (Pakistan Pok) पीओकेमध्ये गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. संपादरम्यान अवामी कृती समितीने मंगळा धरणातून करमुक्त वीज आणि गव्हाच्या पिठावर अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र संप संपवण्यासाठी पोलिसांनी छापे टाकून लोकांना अटक करण्यास सुरुवात केल्यानंतर हिंसाचार उसळला. मुझफ्फराबाद, दडियाल, मीरपूर आणि (Pakistan Pok) पीओकेच्या इतर भागात हिंसाचार उसळला.
या गोंधळामध्ये राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न
पीओकेमधील (Pakistan Pok) निदर्शने दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shahbaz Sharif) यांनी प्रत्येक कोपऱ्यात पोलीस दल तैनात केले आहे. सर्व पक्षांना शांततापूर्ण तोडगा काढण्यास सांगितले आहे. गोंधळ आणि मतभेद असताना काही लोक त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही. (PM Shahbaz Sharif) शाहबाज शरीफ यांनी पीओकेचे पंतप्रधान अन्वारुल हक यांच्याशी चर्चा केली.