ताडकळस ते पालम रोडवर अपघात
पालम (Palam Accident) : शेती कामासाठी महिला मजूर घेऊन जात असलेल्या एका अॅपे रिक्षाला अपघात झाला. ही घटना ताडकळस- पालम रोडवर गुरूवार १८ जुलै रोजी सकाळी घडली. अपघातात एका महिलाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.
शेती कामांसाठी जात होत्या महिला
सय्यद जायदाबी सय्यद अमीन साब वय – ५५ वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, ताडकळसहून पालम तालुक्यातील पेठशिवणी येथे शेती कामांसाठी मजूर घेऊन एक प्रवासी अॅटो जात होता. धानोरा काळे ते हनुमान चौक दरम्यान धावत्या अॅटोसमोर अचानक कुत्रा आल्याने त्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून अॅटो पलटी झाला. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर मलिका जलाल शेख वय – ७५ वर्ष या महिलेचा हात जाग्यावर तुटून पडला. अपघातात शबाना शेख चाँद, लता रामकिशन दुबे, शेख बुशरा शेख चाँद, अहमदा कादरखान पठाण या महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पालम ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. गंभीर जखमींना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.