परभणीतील पालम तालुक्यातील रामापुर तांडा येथील प्रकार
पालम पोलिसात गुन्ह्याची नोंद
परभणी/पालम (Palam Crime) : १५ व्या वित्त आयोगातील निधी मधून काम न करता देयक उचलत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी महिला सरपंचावर १२ डिसेंबर रोजी पालम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा (Palam Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तालुक्यातील रामापुर तांडा येथे २० ऑक्टोबर २०२१ ते ८ सप्टेंबर २०२३ या दरम्यान घडला.
उदयसिंग शेषेराव शिसोदे गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांनी फिर्याद दिली आहे. १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत क्षेत्रात पाईप लाईन, नाली बांधकाम, अंगणवाडी दुरुस्ती व इतर विकास कामासाठी निधी प्राप्त झाला होता. या निधीचा अपहार करण्यात आला. निधीच्या वसुलीसाठी नोटीस दिल्यानंतरही रक्कम भरणा न करत शासनाची फसवणूक केली. या (Palam Crime) प्रकरणी सरपंच श्रीमती सुबाबाई थावरु राठोड यांच्यावर पालम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. के.एस. देवगरे करत आहेत.