परभणीच्या पालम पोलिसात गुन्हा दाखल
परभणी/पालम (Palam Murder case) : मोहरम उत्सवात (Muharram festival) आतेभावा सोबत विनाकारण वाद का घालता, अशी विचारणा करणार्या चाळीस वर्षीय तरुणाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही (Palam Murder case) घटना पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव येथे बुधवार १७ जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुस्तुम गोविंदराव शिंदे वय ४० वर्ष, असे मयताचे नाव आहे. या बाबत शिवाजी ढेंबरे यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किरकोळ वादातून आरोपी हे शिवाजी ठेंबरे यांच्यासोबत विनाकारण हुज्जत घालून वाद करत होते. आरोपी सुदाम कांबळे याने शिवाजी ढेंबरे यांच्या हातात असलेली बॅटरी हिसकावून त्यांच्या डोक्यात मारली. (Palam Murder case) यावेळी बाजुला उभे असलेले शिवाजी ढेंबरे यांचे आतेभाऊ रुस्तुम गोविंदराव शिंदे यांनी आरोपींना विनाकारण मारहाण का केली, असे बोलले असता सुदाम कांबळे, सचिन कांबळे, विजय कांबळे, बाबासाहेब कांबळे, अनिता कांबळे, सलोनी कांबळे, चांगोबाई कांबळे, सुरेश मोडके यांनी रुस्तुम शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
ओढत घरापर्यंत नेले. त्यानंतर डोळ्यामध्ये मिरची पुड टाकली तर सचिन कांबळे याने घराच्या पत्रावर असलेला दगड उचलून रुस्तुम शिंदे यांच्या डोक्यात घातला. दगडाच्या प्रहारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या (Palam Murder case) प्रकरणी शिवाजी ढेंबरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Palam Police) पोलिसांनी आरोपींपैकी दोन महिला, एक पुरुषाला ताब्यात घेतले आहे. तपास सपोनि. राजेंद्र मुंडे करत आहेत.