तोल गेल्याने पडला पाण्यात
जेवनाळा (Krishna Nandanwar Death) : घरासमोरील असलेल्या तलावाच्या खोल पाण्यात तोल जाऊन पडला असता पोहता येत नसल्याने तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. कृष्णा रामाजी नंदनवार (Krishna Nandanwar Death) (५४) रा. कोलबास्वामी चौक पालांदूर तालुका लाखनी असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान उघडकीस आली.
घटनेची माहिती मृतकाचा मुलगा फिर्यादी शंकर नंदनवार (Krishna Nandanwar Death) यांनी पालांदूर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी गावकर्यांची मोठी गर्दी घटनास्थळावर होती. पार्थिव पाण्याबाहेर काढून पंचनामा करीत उत्तरीय तपासणी करून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. तपास पोउपनी विजय हेमने करीत आहेत. पार्थिवावर अंत्यविधी आटोपली.