हिंगोली नगर परिषद व भाविकांनी केले पालखीचे उत्साहात स्वागत
हिंगोली (palanquin ceremony) : श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या (Namdev Maharaj) पालखीचे आगमन २७ जूनला हिंगोलीत झाले. रामलिला मैदानावर आयोजित रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळयाचे पारणे फिटले. हिंगोलीतील महाराजा अग्रेसन चौकात (palanquin ceremony) पालखीचे स्वागत करण्यात आले. ही पालखी इंदिरा चौक, जुन्या (Hingoli Nagar Parishad) नगर परिषद इमारती जवळुन रामलिला मैदानावर पोहचली. यावेळी पावसाच्या सरी कोसळत असताना ही अनेक भाविकांची मैदानावर उपस्थिती होती. या मैदानावर आश्वांचा भव्य रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळयाचे पारणे फिटले. सोहळ्याकरीता मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
पालखीच्या आगमनात कोसळल्या पावसाच्या सरी
रामलिला मैदानावर पालखीचे आगमन (palanquin ceremony) झाल्यानंंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी सपत्नीक पालखीचे पुजन केले. या प्रसंगी चैतन्य लोकेश महाराज, रमेश महाराज, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जगजितराज खुराणा, दिलीप चव्हाण, सुधीरअप्पा सराफ, माजी नगरसेवक अशोक नाईक, गणेश बांगर, माजी नगरसेविका अनिता सुर्यतळ, चंदु लव्हाळे, द्वारकादास सारडा, कृष्णा अग्रवाल, बाळु बांगर, रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, पुतळे, अनिकेत नाईक, अक्षय लव्हाळे, भास्करराव बेंगाळ, भिकाजी कीर्तनकार, अश्वसेवेकरी प्रकाश पाटील वटकळीकर, उपसभापती अशोक श्रीरामे, पालखी सोहळा चालक बळीराम सखाराम सोळंके, हभप संभाजी शिंदे सावेकर, पुजारी नामदेव जाधव, रथचालक बबन मोरे यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती होती. यावेळी (Hingoli Police) हिंगोली शहर ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.