करडी पावर हाऊस जवळील घटना
पालोरा/भंडारा (Palora Accident) : मोहाडी तालुक्यातील करडी पावर हाऊस जवळ दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला. तर १६ मजूर जखमी झाले. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ज्ञानेश्वर तुकाराम शेंदरे (६०) रा. उसगाव ता. साकोली असे मृत मजुराचे नाव आहे. करडी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले.
साकोली तालुक्यातील उसगाव येथील १७ मजूर हे दि.६ डिसेंबर रोजी सकाळी पिकअप वाहन क्र.एम.एच.३६/ए.ए.३१२८ या (Palora Accident) वाहनाने तिरोडा तालुक्यातील विहिरगाव येथे डांबरीकरणाच्या कामावर जात होते. मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो करडी पावर हाऊस जवळ चालक रणजित रामटेके याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित टेम्पो रस्त्यावर उलटला.
त्यात वाहनातील ज्ञानेश्वर शेंदरे (६०), राकेश आंबेडहारे, सुरेश गजभिये (२८), वैâलास शेंदरे (३२), हिरालाल भानारकर (४५), नरेंद्र धुर्वे (४२), राजकुमार बावनथडे (४२), राकेश आकरे (४०), मुकेश रामटेके (२८), शेखर नेवारे (३२), प्रमोद नागोसे (३५), धनराज बावनथडे (३५), भिमराव बावनथडे (४०), रामेश्वर नेवारे (२६), विजय बावनथडे (४८), विश्वास रामटेके (२७) सर्व रा. उसगाव हे जखमी झाले. (Palora Accident) अपघाताची माहिती करडी येथील सरपंच निलिमा इलमे, माजी सरपंच महेंद्र शेंडे यांनी तत्काळ घटनास्थळ गा’ले. नागरिकांच्या मदतीने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे पा’विण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचार्यांची मोठी धावपळ उडाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे हलविण्यात आले. त्या ठीकाणी गंभीर जखमी ज्ञानेश्वर शेंदरे याचा मृत्यू झाला. तर राकेश आंबेडहारे याची प्रकृती चिंताजनक असल्याने या जखमीला तुमसर येथून भंडार्याला हलविण्यात आले. (Palora Accident) अपघाताची माहिती करडी पोलिसांना होताच ठाणेदार विलास मुंडे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. टेम्पोचालक रणजित रामटेके (४०) याला ताब्यात घेतले. अपघातग्रस्त वाहन जप्त केले. सदर अपघाताची नोंद करडी पोलिसात केली आहे.