रेल्वे स्टेशनवर जात असतांना घडला अपघात, करडी गावात शोककळा
पालोरा/भंडारा (Palora Accident) : मुलांनी खूप शिकून उच्च पदावर पोहोचावे, अशी आशा बाळगून असलेल्या करडी येथील साठवणे कुटुंबावर काळाने घाला घातला. देव्हाडा-करडी मार्गावर साखर कारखान्यासमोर दुपारी ३.३० वाजतादरम्यान झालेल्या भीषण अपघातात (Palora Accident) सख्या दोघा भावंडांचा दुर्देवी मृत्यू झाला. प्रज्वल कृष्णकुमार साठवणे (२०) व निखिल कृष्णकुमार साठवणे (२२), दोघेही रा.करडी, असे मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.