हिंगोली (Hingoli):- कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व भाटेगाव ग्रामपंचायतच्या निलंबित ग्रामविकास अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर ही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.एम.आम्ले यांच्या निलंबनाचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी काढले आहे.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी काढले आदेश
डोंगरकडा व भाटेगाव ग्रामविकास अधिकारी मुकूंद घनसावंत यांच्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी (inquiry) करण्याची सुचना जिल्हा परिषद(Zilla Parishad) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार यांनी दिल्या होत्या. त्यावरून गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांनी केलेल्या चौकशीत लाभार्थ्यांनी पैसे दिल्याचा जवाब नोंदविल्यानंतर ४ जुलैला रात्री उशिरा निलंबनाचे आदेश काढले होते. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी घनसावंत यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a case)करण्यासाठी विस्तार अधिकारी एस.एम.आम्ले यांना प्राधीकृत करून योग्य त्या सुचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी गंभीर प्रकरणातील दोषी (Guilty) कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुुळे गटविकास अधिकारी बारगिरे यांनी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात जाऊन ५ जुलैला गुन्हा दाखल केला होता. याबाबतचा अहवाल बारगिरे यांनी जि.प.कडे सादर करून कर्तव्यास कसुर केल्याचे नमुद केले होते. पर्यवेक्षीय अधिकारी (Supervisory Officer) म्हणुन दिलेली जवाबदारी सक्षमपणे पार न पाडता तसेच वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यास कसुर करणे या आरोपावरुन विस्तार अधिकारी एस.एम. आम्ले यांच्या निलंबनाचे आदेश प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी काढले आहे.
दरम्यान हे निलंबनाचे आदेश काढल्याने एकच खळबळ उडाली आहे.