१० सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
परभणी/पाथरी (Pathari Heavy rains) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाथरी तहसीलदार यांच्या आदेशाने पाथरी तालुक्यातील गाव शिवारात ३१ ऑगस्ट १ व २ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे (Heavy rains) शेतीपिके ,पशुधन व शेतीपूरक साहित्य व पडझड यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी त्रिसदस्यीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवार १० सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गावनिहाय पथकांची स्थापना, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक पथकात समावेश
३१ ऑगस्ट ,१ व २ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमध्ये (Heavy rains) पाथरी तालुक्यातील नदीपात्र शेजारील शेतकर्यांचे व शिवारातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधी ( एनडीआरएफ व एसडीआरएफ ) निकषानुसार ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. त्यानुसार महसूल प्रशासनाकडून आदेश निघाले असून नुकसानीच्या पाहणी व पंचनाम्यासाठी गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. संबंधित पथकांना पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल विहित प्रपत्रांमध्ये मंगळवार १० सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयात सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
३३ टक्के च्या पुढे पीक नुकसानी संदर्भात आदेशाने शेतकरी संभ्रमात
पाथरीच्या तहसीलदारांनी (Heavy rains) अतिवृष्टीच्या पंचनामांच्या बाबतीत काढलेल्या आदेशाने शेतकऱ्यांमध्ये आपल्या (agricultural crops) नुकसानीचे पंचनामे होणार की नाही असा संभ्रम तयार झाला आहे. शासन १०० टक्के नुकसानीची भरपाई द्यायच्या तयारीत असताना फक्त नदीकाठच्या गावचे पंचनामे आणि३३ टक्के नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचा आदेश काढणं चुकीचं आहे.आपण पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बोललो. २४ तासांमध्ये ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. संभ्रम निर्माण करणारा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी,अशी विनंती आपण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
– डॉ. उमेश देशमुख, प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश भाजपा
केंद्र शासन व राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार मदत देण्यासाठी ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस (Heavy rains) झालेल्या सर्व ठिकाणी ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले असल्यास पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव सादर करायचा आहे. पंचनामे करण्यासाठी त्रिसदस्यीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी पाथरी
कृषिमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
अतिवृष्टीचा ६५ मिमी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये निकषापेक्षा काही पटीने अधिक पाऊस झाल्याचे (Heavy rains) अतिवृष्टीनंतर केलेल्या पीक नुकसान पाहणी दौऱ्यात राज्याच्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते. कृषीमंत्र्यांनी एसडीआरएफ व एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त प्रमाणात मदत देण्याचे म्हटले होते. यावेळी नदी किनारी भागात जमिनीची खरडून झालेले नुकसान ,पशुधनाची जीवितहानी व पाईपलाईन , स्पिंकलर पाईप पुराच्या पाण्यात वाहून जाऊन झालेले नुकसान या संदर्भात पंचनामे करण्यात येतील व उर्वरित शेती पिकांच्या नुकसानीला सरसकट मदत करण्यात येईल, असे जाहीर केले होते.