उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक
अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा
मानोरा (ShivSena Andolan ) : तालुक्यातील इंझोरी मंडळात दि. २५ व २६ जूनला अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत आपणाला निवेदन देऊनही पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे येत्या ८ ऑगस्ट पर्यंत पंचनामे Heavy Rains) (करण्यात यावे, अन्यथा त्याच दिवशी ठिय्या आंदोलन (ShivSena Andolan) करण्याचा इशाराचे निवेदन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, इंझोरी मंडळात २५ व २६ जून रोजी अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस कोसळला. या (Heavy Rains) पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे शुक्रवार पर्यंत पंचनामे करण्यात आले नाही, तर ठिय्या आंदोलन (ShivSena Andolan) करण्याचा इशाऱ्याचे निवेदन उभाठा शिवसेनेचे पदाधिकारी यांनी कृषी अधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी देवानंद हळदे, हरीश दिघडे, हिम्मत राऊत, आकाश हळदे, जगदीश आरेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.