रेल्वेच्या नांदेड विभागाची माहिती
परभणी (Pandharpur Railway) : पंढरपूर येथील (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशीसाठी नांदेड विभागातून (Pandharpur trains) पंढरपूरसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांचा भाविक भक्तांना लाभ होणार आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात. यावेळी १७ जुलैला आषाढी एकादशी येत आहे. पंढरपूरकडे जाणार्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद येथून (Pandharpur Railway) पंढरपूरकरीता विशेष गाड्या चलविण्यात येणार आहे. १६ जुलै ते १८ जुलै दरम्यान या गाड्या धावणार आहेत.
नगरसोल-पंढरपू-नगरसोल ही गाडी रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जानला, परतूर, सेलू, मानवतरोड, परभणी, गंगाखेड, परळी वै., लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शि टाऊन, कुरूडवाडी मार्गे धावेल. (Pandharpur Railway) अकोला-पंढरपूर-अकोला ही विशेष गाडी वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वै., पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चितपूर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुरूडवाडी मार्गे धावेल. अदिलाबाद – पंढरपूर-अदिलाबाद ही गाडी किनवट, बोधडी, धानोरा, सहस्त्रकुंड, हिमायत नगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा जं., परभणी, उस्मानाबाद, कुरूडवाडी या मार्गे धावेल.