परभणीच्या गंगाखेड येथील संत जनाबाई पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान
परभणी/गंगाखेड (pandharpur wari) : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संत जनाबाईच्या पालखीचे (Sant Janabai Palkhi) गंगाखेड येथून पंढरपुरकडे (pandharpur wari) पायी चालत दि. ३ जुलै बुधवार रोजी दुपारी ४ वाजता प्रस्थान झाले. यावेळी (Sant Janabai Palkhi) संत जनाबाईच्या पालखीला निरोप देण्यासाठी शहर व तालुका परिसरातील भक्तगण तथा संत जनाबाई संस्थानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत जनाबाईचे (Sant Janabai Palkhi) जन्मस्थान गंगाखेड येथून दरवर्षी प्रमाणे पंढरपुरकडे जाण्यासाठी पायी जाणाऱ्या पालखीची वारकरी संप्रदायातील भक्तांनी दि. ३ जुलै बुधवार रोजी सकाळपासुनच जय्यत तयारी करत दुपारी संत जनाबाई मंदिरात संत जनाबाईच्या मुर्तीची महा आरतीकरुन शहरातील मुख्य रस्त्यावरुन अभंग गात वाजत, गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. अभंगात मंत्रमुग्ध असंख्य भक्तगण यात सहभागी झाले होते. (Sant Janabai Palkhi) संत जनाबाई मंदिरापासून निघालेली शहरातील व्यापार पेठेच्या मुख्य मार्गाने निघाली असता या पालखीचे व्यापारी बांधवांसह नागरीकांनी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करत पुष्पवृष्टी केली.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास पालखी परळी नाका येथे पोहचताच येथील आरतीच्या कार्यक्रमात उपस्थित महिला व पुरुष भक्तांनी संत जनाबाईचे अभंग म्हणत पालखीला निरोप दिला. यावेळी उपस्थित भक्तगण श्रोते अभंगाने मंत्रमुग्ध झाले होते. (Sant Janabai Palkhi) संत जनाबाईच्या पालखीने दिंडी चालक तथा संत जनाबाई संस्थानचे अजीव सभासद शिवाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार रोजी पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरकडे (pandharpur wari) प्रस्थान केले. संत जनाबाईच्या पालखी सोबत असंख्य महीला, पुरूष, वारकरी बांधव रवाना झाले. पालखीला निरोप देण्यासाठी संत जनाबाई संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील महीला, पुरुष नागरीक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.