– अमर बोरसे
शेगाव (Pandharpur Yatra) : उद्या विठुरायाच्या पंढरपुरात (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशीचा सोहळा पार पडत असून विदर्भ पंढरीत देखील आषाढीला लाखो भाविक भक्त श्रींच्या दर्शनासाठी येतात. आज 16 जुलै रोजी आषाढीच्या पूर्वसंध्येलाच संतनगरीत भक्तांचा जनसागर उसळला आहे. त्यामुळे भक्तांना श्रीं संत गजानन महाराजांचे (Gajanan Maharaj) दर्शन घेता यावे यासाठी आज रात्रभर श्रींचे मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला असून उद्या आषाढी एकादशीला रात्री गर्दी कमी होईपर्यंत मंदिर सुरू राहणार आहे.
गण गण गणात बोते… चालला नामाचा गजर यासह श्रींचे अभंग व भजन गात संतनगरीकडे भाविकांची ओढ सुरू आहे. (Pandharpur Yatra) पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शनासाठी जाऊ न शकणारे भाविक – भक्त संतनगरीत येऊन श्री संत गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) चरणी माथा टेकवून आशीर्वाद प्राप्त करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी देखील भाविकांची मोठी मांदियाळी संतनगरीत असते त्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी व सर्वांचे दर्शन व्हावे या हेतूने आज 16 जुलै रोजी रात्रभर मंदिर सुरू असून उद्या १७ जुलै रोजी (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशीला रात्री उशिरापर्यंत (गर्दी कमी होईपर्यंत) मंदिर सुरू राहणार आहे.