सहकार विद्या मंदिराच्या चिमुकल्यांनी साकारलं दिंडी सोहळ्यात साक्षात विठ्ठल रुक्मिणीचं रुप
बुलढाणा (Pandharpur yatra) : मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, (Buldhana Urban bank) बुलढाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेश झंवर बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षा सौ कोमल सुकेश झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली. दरवर्षीप्रमाणे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये सहकार विद्या मंदिर जानेफळ मा.श्री मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ,सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने थाटामाटात दिंडी सोहळा पार पडण्यात आला सहकार विद्या मंदिराच्या चिमुकल्यांनी दिंडी सोहळ्यात साक्षात विठ्ठल रुक्मिणीचं रुप साकारलं.
दिंडीमध्ये शाळेतील नर्सरी ते दहावीचे अशा सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्व चिमुकल्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिंडीमध्ये कलशधारी,वृंदावन धारी ,टाळकरी तसेच मृदंगधारी ,विणेकरी चोपदार व पालखी धारी असे आगळ्यावेगळ्या वेशात पालखीमध्ये सहभागी झाले होते. जानेफळ नगरीत जणू पंढरी अवतरलेली होती. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी लेझीम, पावली , फुगडी असे विविध प्रकारचे रिंगण घालून पंढरीचे रूप आणले होते. (Pandharpur yatra) विठोबाने रखुमाईच्या जोडीने तर सर्व भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. गावकरी मंडळींकडून वेळोवेळी पालखीचे,विठोबा रखुमाईचे तसेच विणेकऱ्यांचे दर्शन घेऊन पूजनही करण्यात आले.गावकरी मंडळी कडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. नयनरम्य दिंडी सोहळा जानेफळ नगरीत मोठ्या उत्साहात सर्व मान्यवरांच्या स्वागताने प्रारंभ करण्यात आला. पंढरीचे रूप दिसे त्रिभुवनी असा आगळावेगळा लोभस आणि आकर्षक सोहळा सहकार विद्या मंदिर जानेफळ तर्फे जानेफळ नगरीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे हे होते त्यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी कार्यक्रमास आमंत्रित दै देशोन्नतीचे मेहकर तालुका प्रतिनिधी अमर राऊत, (Buldhana Urban bank) बुलढाणा अर्बनचे जानेफळ शाखा व्यवस्थापक अरुण लाहोटी खुपिया विभागाचे कैलास चतरकर यांच्यासह गावकरी बुलढाणा अर्बनचे कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. (Pandharpur yatra) कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हिवरकर यांचे मार्गदर्शन तसेच शाळेतील सहशिक्षिका सौ.गायत्री जोशी, संदीप साबळे,अनिता शिंदे,स्वाती लोखंडे, पूजा मिटकरी, अर्चना काळे,अर्चना खराडे, दिपाली चांदणे, दिपाली राजुरकर, विनोद चंद, मंगेश चंद , रिता गिरी, नेहा निकस, संकेत उंबरकर, सोनाली गाडेकर, राजेश चांदणे, कल्पना सोळंके, शितल कुटे, निकिता आव्हाळे, सौ. सुरेखा धोटे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.