पंढरपुरला हजारो भाविक दर्शनास जाणार
हिंगोली (Pandharpur yatra) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या (Pandharpur yatra) पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाच्या दर्शना करीता जाणार्या भक्तांसाठी हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारातून ६५ बसेस सोडल्या जाणार आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे हिंगोली आगारातर्फे १३ जुलै पासून २५ जादा बसेस (Pandharpur buses) सोडल्या जाणार असून कुठेही भाविकांची पंढरपुरला जाण्याकरीता गैरसोय होणार नाही, याची खबरदारी आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले यांनी घेतली असल्याची माहिती दिली.
तिन्ही आगाराने बसेस सोडण्याचे केले नियोजन
गतवर्षी हिंगोली आगारातर्पेâ २२ बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच कळमनुरी आगाराच्या वतीने १२ जुलै पासून भाविकांना पंढरपुरला जाण्याकरीता १५ बसेसचे नियोजन केले असल्याची माहिती आगार प्रमुख अकबर पठाण यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे वसमत आगाराच्यावतीने (Pandharpur yatra) पंढरपूर करीता १३ जुलै पासून २५ जादा बसेस २४ जुलै पर्यंत सोडल्या जाणार असल्याची माहिती आगार प्रमुख के.व्ही. कर्हाळे यांनी दिली आहे. ज्या-ज्या गावामध्ये परीवहन मंडळाची बस जाते, अशा गावातील ४० प्रवासी पंढरपुरला जाणार असल्यास त्यांच्यासाठी देखील ही बस पंढरपुरला (Pandharpur buses) जाण्याकरीता सोडली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.