हिंगोली (Pandharpur yatra) : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज (Namdev Maharaj) यांचे जन्मस्थान असलेल्या नर्सी नामदेव येथून दरवर्षी पायदळ (Palkhi Dindi ceremony) पालखी दिंडी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो संत नामदेवाच्या दिंडी सोहळ्याचे हे २९ वे वर्ष असून या वर्षी देखील पालखी सोहळ्याचे २६ जून रोजी प्रस्थान झाले आहे. उद्या २७ जूनला हिंगोलीत पालखीचा रिंगण सोहळा पार पडणार आहे.यानिमित्त हिंगोली नगर परिषदर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र नरसी नामदेव (Namdev Maharaj) येथे २६ जूनला बुधवारी दुपारी पालखी दिंडी सोहळ्याची गावातील मुख्य मार्गाने नगर प्रदक्षिणा काढून येथील भाविक काशिनाथ उफाड यांच्या निवासस्थानी दिंडीचा पहिला मुक्काम व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. २७ जून रोजी सकाळी टाळ मृदंगाचा गजर करीत विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी चालक बळीराम सोळंके यांच्या नेतृत्वाखाली (Pandharpur yatra) पंढरपूर वारीसाठी श्री चा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात मार्गस्थ होणार आहे.
जवळपास चारशे वारकरी सहभागी असलेल्या या दिंडी सोहळ्याचे नर्सी ते (Pandharpur yatra) पंढरपूर दरम्यान एकूण १९ ठिकाणी मुक्काम पडणार असून यामध्ये ता.२६ जून रोजी नर्सी ता.२७ हिंगोली,२८जून औंढा नागनाथ,२९जून बाराशिव,३०रोजी हट्टा, १ जुलै परभणी,२ जुलै पोखर्णी,३ जुलै गंगाखेड,४ जुलै उकडगाव,५ जुलै परळी वैजनाथ,६ जुलै अंबाजोगाई,७ जुलै बोरी सावरगाव,८ जुलै वडगाव रामा,९ जुलै मसा,१० जुलै दगड धानोरा,११ जुलै खांडवी,१२ जुलै चिंचगाव टेकडी,१३ लहुळ,१४ जुलै आष्टी तर १५ ते २१ जुलै रोजी पंढरपूर येथे मुक्काम राहणार आहे. दरम्यान पालखी दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी चार रिंगण सोहळे होणार असून पहिले अश्व रिंगण हे हिंगोली येथे दुसरे परळी वैजनाथ, तिसरे अंबेजोगाई तर चौथे रिंगण हे जऊळबन या ठिकाणी रंगणार आहे.
हिंगोलीत उद्या रिंगण सोहळा
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या (Namdev Maharaj) पालखी सोहळ्या निमित्त आज २७ जून गुरूवार रोजी दुपारी ४ वाजता रामलिला मैदानावर रिंगण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान यापूर्वी पालखीचे आगमन हिंगोली शहरात झाल्यानंतर महाराजा अग्रसेन चौकात नगर परिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ही पालखी इंदिरा गांधी चौक, जुन्या नगर परिषद इमारती जवळून रामलिला मैदानावर पोहचणार आहे. मैदानावर रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत. (Palkhi Dindi ceremony) पालखी सोहळ्यात शहरवासीयांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.