माहूर फाट्याजवळील स्व. सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एसटीचा भीषण अपघात
पुसद (Pandharpur Yatra) : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूरला (Pandharpur Yatra) राज्यातील अनेक जिल्ह्यातून वारकरी मंडळी, विठ्ठलाचे भक्त दर्शनाकरिता जात असतात वर्धा जिल्ह्यातून वर्धा डेपोची वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटी बस क्रमांक MH 14 BT 4676 या बसचा चालक सचिन गंगाधर गव्हाणे व वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे दोघेही गाडीमध्येच मद्यपान करून नाचून धिंगाणा होते असा आरोप गाडीमधील वारकरी बांधवांनी महिलांनी केला आहे .शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माहूर फाट्या जवळील स्व. सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ दि. 15 जुलै च्या रात्रीच्या 10 वाजताच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने डिव्हायडरला जबर धडक दिल्याने सदर (ST Bus Accident) एसटीचा भीषण अपघात झाला.
एका वारकरी महिलेची कंबर मोडली तर एक लहान बालक जखमी
यावेळी बस मध्ये 45 वारकरी आपल्या मुलाबाळांसह प्रवास करीत होते. त्यांचा थोडक्यात जीव बचावला तर एका वयोवृद्ध महिला वारकरी कांताबाई नामदेव लडके रा. शिरपूर तालुका देवळी वय 74 वर्ष या गंभीर जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. लहान वारकरी मुलगा शंतनु दिलीप भगत वय 14 वर्ष रा.वायगाव तालुका वर्धा यालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. या (ST Bus Accident) घटनेमुळे वारकऱ्यांना मधातच अडकावे लागले होते.
या बसमधील चालकाच्या व वाहकाच्या बॅगमधून देशीचा बंपर व इंग्लिश दारूचा बंपर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात घटनेची माहिती मिळताच पुसद डेपोचे आगार प्रमुख मंगेश पांडे व एटीएस अमजद खान यांनी घटनास्थळ गाठून तातडीने वारकऱ्यांना बस स्थानकात आणून त्यांना (Pandharpur Yatra) पंढरपूर करिता दुसऱ्या गाडीत बसून दिले. तर गंभीर जखमी असलेल्या महिलेला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.
या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात (Pusad City Police) मंगेश पांडे व एटीएस अमजद खान यांनी रीतसर तक्रार केली. शहर पोलिसांनी चालक व वाहक यांची उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. यासंदर्भात (Pusad City Police) पुसद शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या भीषण अपघातात एसटी बसचे ही मोठे नुकसान झाले.
राज्य शासनाच्या एसटी महामंडळाच्या पंढरपूरला (Pandharpur Yatra) घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एसटी बस मधील ड्रायव्हर व कंडक्टर हे मद्यप्राशन करून नाचत होते. तर प्रवासी बांधवांकडून वारकऱ्यांकडून प्रत्येकी शंभर रुपये त्यांनी घेतल्याचा आरोपही बसमधील वारकरी महिलांनी केला आहे. अनेक दिवसापासून आमचा पगार झाला नाही. आम्हाला खर्च पाणी साठी पैसे द्या. असा दमही या दोघांनी बसमधील प्रवाशांना भरला आहे. या गंभीर घटनेकडे संबंधित अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.