खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी वारकर्याचा मृतदेह स्वखर्चाने रूग्णवाहिकेने सोडगावला पाठविला
कळमनुरी/हिंगोली (Pandharpur yatra) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील एका (Pandharpur yatra) वारकर्याचा बारामती येथे दिंडीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सदर बाब हिंगोली लोकसभा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सर्व प्रक्रिया करून सदर मृतदेह बारामती ते वारकर्याच्या गावी सोडेगावपर्यंत स्वखर्चाने रुग्णवाहिकेने पाठविला.
हिंगोलीसह राज्यभरातून आषाढी एकादशीनिमित्त (Pandharpur yatra) विठूल-रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी हजारो दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील वारकरी लक्ष्मण मारोती दांडेगावकर (५०) हे दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करत असतात. यावर्षी निवृत्ती महाराज साडेगावकर यांच्या दिंडीत पायी निघाले होते; परंतु बारामती येथे १२ जुलै रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Hingoli Hospital) दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती दांडेगावकर यांचे सहकारी सुरेश दांडेगावकर यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांना दिली. नागेश पाटील यांनी दिल्ली येथून तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सर्व प्रक्रिया पूर्ण करून देण्याची सूचना केली. तसेच बारामती/ इंदापूरचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना संपर्क करून स्थानिक पोलीस अधिकार्यांच्या मदतीने वारकरी लक्ष्मण मारोती दांडेगावकर यांचा मृतदेह कळमनुरी तालुक्यातील सोडेगावपर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली.
विशेष म्हणजे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बारामती ते सोडेगावपर्यंत दांडेगावकर यांचा मृतदेह स्वखर्चाने (Hingoli Hospital) रुग्णवाहिकेने पाठविला. (Nagesh Patil Ashtikar) नागेश पाटील यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी आभार मानले. (Nagesh Patil Ashtikar) खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सध्या दिल्ली येथे असून परत आल्यानंतर दांडेगावकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती आष्टीकर यांचे स्वीय सहाय्यक विनोद हामणे यांनी दिली.