पानगाव (Pangaon protest) : रेणापूर तालुक्यातील पानगाव-खरोळा फाटा रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी होत असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने पानगावमध्ये अर्धनग्न होत बोंबाबोंब आंदोलन (Pangaon protes)t करण्यात आले.
पानगाव परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने पानगाव – खरोळा फाटा महामार्ग ३६१ एच या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी १५ ऑगस्टपासून साखळी उपोषण ग्रामस्थांच्यावतीने चालू असून याकडे संबंधित प्रशासन गांभिर्याने लक्ष देत नाही. याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येत आहे. म्हणून उपोषणास्थळी दहाव्या दिवसी जागरण गोंधळ, नंतर केश मुंडन आंदोलन, तेरावाही करुन गुरुवारी (दि.२९) पानगाव येथे ग्रामस्थांच्यावतीने (Pangaon protest) अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन केले. प्रशासनाने अद्यापही कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पानगावकर रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत. अर्धनग्न आंदोलनात खंडू रामरुळे, शिवाजी जोशी, वैजनाथ मेटाडे, हरिभाऊ राजपुत, गौतम आचार्य, गोविंद नरारे, वैजनाथ कस्पटे, महादु फुले, राहुल मोटाडे, रमाकांत वाघमारे, सतीष भंडारे, इलाही शेख, संतोष भाजीभाकरे आदि गावातील नागरीक उपस्थित होते.