संघर्ष समितीच्या आंदोलनाचे पहिले यश
परभणी (Pani Sangharsh Samiti) : मानवत व परभणी तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी प्रश्नांवर पुकारलेल्या रास्ता रोको नंतर प्रशासनाने गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. सर्व्हेक्षणाचा आदेश शासनाकडे कार्यकारी अभियंता प्र.ब.लांब यांनी सादर केला असून मानवत मधिल ४८ व परभणीतील ६ अशा ५४ गावांचा पाणी सिंचनाचा प्रश्न मार्ग लावण्याचा पहिला टप्पा पार झाला असल्याची माहिती सर्व पक्षीय (Pani Sangharsh Samiti) संघर्ष समितीचे सदस्य रंगनाथ सोळंके यांनी दिली.
पत्रकात परिषद घेत रंगनाथ सोळंके यांची माहिती
जिंतूर रोडवरील हॉटेल जैन गार्डन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत (Pani Sangharsh Samiti) संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांकडून माहिती देण्यात आली. रंगनाथ सोळंके हे पुढे म्हणाले की, ४२ गाव संघर्ष समितीची स्थापना झाल्यापासून गावांचा पाणी प्रश्न लावून धरला आहे. मागील अनेक वर्षांपासून ४२ गाव संघर्ष समितीकडून प्रशासनाकडे पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली जात आहे. ८ ऑगस्ट रोजी समितीने रास्ता रोको आनंदोलन पुकारले होते. परंतु शासनाने आंदोलनापुर्वीच मुख्य अभियंता व मुख्यप्रशासक लाभक्षेत्र विकास विभाग (जलसंपदा) छत्रपती संभाजी नगर यांनी पाणी उपलब्धतेनुसार प्राथमिक सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले.
जनजागृती अभियान काढणार – रंगनाथ सोळंके
त्यानुसार सर्व्हेक्षण अहवाल बीड येथील अधिक्षक अभियंता व प्रशासक यांच्याकडे सादर केला आहे. आता तो अहवाल छत्रपती संभाजी महाराज कार्यालया अंतर्गत गादावरी खोरे विकास महामंडळ यांच्याकडे जाणार आहे. (Pani Sangharsh Samiti) अहवालात रामपुरी बु. येथुन नदीवर उपसा योजना करुन १६ गावाचा, दुधना नदिवर मगर सावंगी व इरळद दरम्यान बंधारा बांधणे, दुधना नदिवर कोथळा ते वडगाव दरम्यान बंधारा बांधुन उपसा योजना, कुंभारी ते डिग्रस दरम्यान बंधारा बांधुन उपायोजना राबविल्यास ५४ गावांचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचे सांगीतले आहे. यावेळी संघर्ष समितीचे सदस्य संतोष देशमुख, शिवाजी बोचरे, माणिक काळे, अर्जुन साबळे, सुभाष जाधव, सरपंच गोरे, दामोदर घुले, हरिभाऊ र्निवळ, भानुदास शिंदे व इतर सदस्यांची उपस्थिती होती.