परभणी/पूर्णा(Parbhani):- शहरातील डॉ. आंबेडकर नगर, म. फुले नगर, सिद्धार्थ नगर, रमाई नगर, नालंदा नगर, रेल्वे कॉलनी, संस्कृती नगर आदी भागातील विद्यार्थी, अबालवृध्द नागरीकांना मध्यवर्ती शहरात येण्यासाठी रेल्वे पटरी ओलांडून ये – जा करावी लागते. मात्र लोहमार्गाचे विद्युतिकरण (Electrification) झाल्यामुळे पावसाळ्यात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
पूर्णा स्थानिकात गेल्या तीन महिन्यापासून रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण
पूर्णा स्थानिकात गेल्या तीन महिन्यापासून रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वे गाड्यांची सतत वर्दळ सुरु असते. मात्र रेल्वेस्थानकाच्या एका बाजूला असलेल्या वसाहतीतील नागरीकांना लोहमार्ग ओलांडताना वीजेचा धक्का लागून अपघात (Accident)होण्याची शक्यता नाकारत येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह आम जनता छत्री घेऊन ये जा करत असतात. मात्र धक्कादायक बाब अशी की, अंगावर छत्री असताना रेल्वे क्रॉसिंग करत असताना वीजेचा धक्का लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत वेळीच दक्षता न घेतल्यास मोठ्या अपघाताचा धोका नाकारत येत नाही. मार्गावर ओव्हर ब्रिज व्हावा यासाठी अनेक वर्षापासून ची रेल्वे प्रशासनाकडे मागणी आहे. भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, प्रदिप ननवरे यांनी व पूर्णा शहरातील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी रेल्वे ओव्हर ब्रिज ची मागणी केलेली आहे.परंतु त्या आश्वासनाची आतापर्यंत परिपुर्तता झाली नाही.