परभणी (Parbhani):- राज्यसरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री(Chief Minister) युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगाव व उद्योजकता विभागाचे संकेतस्थळ चालत नसल्याने बेरोजगार उमेदवारांनी योजनेसाठी कशी नोंदणी करावी ? असा संतप्त सवाल आता उमेदवारांतून विचारला जात आहे.
बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत संबंधीत आस्थापना विभागात योजनेंतर्गत अर्ज करता येतो
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कौशल्य विभागाच्या (Department of Skills) महास्वयंम या संकेतस्थळावर बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत संबंधीत आस्थापना विभागात योजनेंतर्गत अर्ज करता येतो. मात्र महास्वयंम हे संकेतस्थळ चालत नसल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांची हिरमोड होत आहे. त्यामुळे रात्री – अपरात्री सुध्दा संकेतस्थळावर नोंदणी करावी लागत आहे. त्यामुळे नाहक खर्चाचा भुर्दंड बेरोजगार उमेदवारांना बसत आहे. आधीच बेरोजगार त्यात संकेतस्थळ चालेना ? अशा विपरीत परिस्थितीत कोणाकडे दाद मागावी ? असा सवाल आता उमेदवारांतून विचारला जात आहे. योजनेंतर्गत सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत तसेच इतर आस्थापनांत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेस जिल्ह्यात बेरोजगार उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून या योजनेंतर्गत शासकीय व निमशसकीय, खसगी आस्थापनांत लिपीक, कार्यालय सहाय्यक, ऑपरेटर, शिपाई, परिचर, सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक, वार्ड बॉय, तलाठी, सहाय्यक, सुरक्षा गार्ड, स्वयंपाकी वार्डन, शिक्षक, आरोग्य सेवक(health worker), आरोग्य सेविका, माळी, बागकाम सहाय्यक आदी पदे प्रशिक्षणासाठी भरण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत किती उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते ते येत्या काळात समजणार आहे.