परभणी (Parbhani):- विना हेल्मेट, वाहन चालविण्याचा परवाना नसलेले तसेच आवश्यक कागदपत्र सोबत न ठेवलेल्या वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी गंगाखेड रोडवर राबविलेल्या मोहिमेत १५६ वाहनचालकांना १ लाख ५२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
महामार्गच्या सपोनि. अर्चना करपुडे , पोलिस अंमलदार संजय पुरी, शाम काळे, सुरेश टिपरसे, उत्तरेश्वर घुगे व पथकाने मोहिमेत सहभाग घेतला. विना हेल्मेट असलेल्या १२८ वाहनचालकांवर कारवाई (action) करत १ लाख २८ हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. विना परवाना, आवश्यक कागदपत्र सोबत न ठेवलेल्या वााहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढे देखील कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाच्या (Police Administration) वतीने सांगण्यात आले आहे.