परभणी / पंढरपुर(Parbhani):- येथे आषाढी यात्रेसाठी परभणी विभागातून वारकर्यांच्या सेवेसाठी २४० विशेष बसचे नियोजन करण्यात आले असून विभागातील सात आगारातून या बसेस धावणार आहेत.
मुख्य यात्रा बुधवार १७ जुलै रोजी संपन्न होणार
पंढरपुरचा(Pandharpur) विठ्ठल सर्वसामान्यांसाठी आस्थेचा विषय असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आषाढी यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी पंढरपुरात जमत असतात. यावर्षी आषाढी यात्रेचा कालावधी १३ जुलै ते २२ जुलै असून सोमवार १५ जुलै रोजी रिंगण सोहळा तर मुख्य यात्रा बुधवार १७ जुलै रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी भक्त रेल्वे, बस, खाजगी वाहने यांचा वापर करत पंढरपुरला जात असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त हे वारीत पायी सहभागी होतात. हे भक्त परतीच्यावेळी अनेकवेळा वाहनांचा प्रवास करत पार्टीच्या प्रवासात करतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर एकाच वेळी मोठा भार पडतो. यासाठी परभणी विभागातून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील भाविक भक्तांसाठी २४० विशेष बसचे (Bus)नियोजन शुक्रवार १२ जुलै पासून करण्यात आले असून लोकप्रतिनिधी किंवा विविध गटांनी मागणी केल्यास यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे.
प्रवाशांना विविध योजनांतर्गत सवलत देण्यात येणार
यासाठी विभागातील परभणी, जिंतूर, हिंगोली, गंगाखेड, पाथरी, वसमत, कळमनुरी आगारातील व्यवस्थापकांकडून नियोजन करण्यात येत आहे. तसेच औंढा नागनाथ, सेनगाव, सेलू, मानवत, सोनपेठ, आखाडा बाळापुर, वारंगा, पालम, झिरो फाटा या ठिकाणाहून पुरेशे प्रवासी उपलब्ध झाल्यास त्या भागातील आगार प्रमुख जास्तीच्या गाड्या उपलब्ध करुन देतील. तसेच आगार प्रमुखांना त्यांच्या परिसरातील सरपंच व स्थानिक प्रतिनिधींनी त्यांच्या गावातून पंढरपुरला जाण्यासाठी व परत येण्यासाठी एसटी बसची मागणी केल्यास त्या संबंधिचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रवाशांना विविध योजनांतर्गत सवलत देण्यात येत असल्यामुळे महामंडळाच्या या आषाढी वारीच्या विशेष बसेसना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ सुध्दा होणार आहे. या विशेष बसेसचा विभागातील भाविक भक्तांनी(Devout devotees) लाभ घेण्याचे आवाहन परभणी विभागाकडून करण्यात आले आहे.