परभणी (Parbhani):- जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार्या वनमहोत्सवात लागवडीसाठी (Cultivation) ६ लाख ६७ हजार ३८५ रोपे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही रोपे जिल्हाभरातील १२ रोपवाटीकांमध्ये विविध प्रजातींसह प्रशासकीय विभाग(Administrative Division), निमशासकीय यंत्रणा, नागरीकांसह शेतकर्यांना त्यांच्या मागणीनुसार देण्यात येणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये १ कोटी ३७ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट
राज्य शासनाच्या वतीने पावसाळ्यात (Rain)मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असते त्या अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये १ कोटी ३७ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच केंद्रस्तरावर ‘प्लांट फॉर मदर’ योजना राबविण्यात येत आहे. त्यासोबत राज्यस्तरावर १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग(Department of Forestry), वन विभाग(Forest Department), विविध रोपवाटीकांमधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडे सध्या १२ रोपवाटीकांमध्ये ६ लाख ६७ हजार ३८५ रोपे उपलब्ध आहेत.
वनीकरण विभागाकडे सध्या १२ रोपवाटीकांमध्ये ६ लाख ६७ हजार ३८५ रोपे उपलब्ध
यामध्ये सोनपेठ तालुक्यातील वरखेड रोपवाटीकेत ६० हजार, डिघोळ रोपवाटीकेत २५ हजार, गंगापिंपरी रोपवाटीका ५० हजार, सेलू येथील करजखेडा रोपवाटीकेत ६० हजार, पोहंडूळ रोपवाटीकेत २५ हजार, गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी रोपवाटीकेत १ लाख १६ हजार, पूर्णा तालुक्यातील सोनखेड रोपवाटीकेत ५० हजार, चुडावा रोपवाटीका ५० हजार, फुलकळस रोपवाटीका १ लाख, जिंतूर तालुक्यातील अकोली रोपवाटीका ८० हजार, भिलज रोपवाटीकेत ४९ हजार ७०० रोपे विविध प्रजातीनिहाय उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रजातींमध्ये करंज, चिंच, बांबु, सिताफळ, शिसु, पेरु, कडूलिंब, जांभुळ, सेमल, कांचन, कवट, रिठा, साग, सिवन, बदाम, शेवगा, आवळा, रेनट्री, बेल, वड, पिंपळ, मोहगणी, सिरस आदी प्रजातींची रोपे मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच तालुकास्तरावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून ही रोपे जिल्हाभरात राबविण्यात येणार्या वनमहोत्सवात उपलब्ध होणार आहेत.
मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन
प्रशासकीय विभागांमध्ये नागरीकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांनी केले आहे. बारा रोपवाटीकांमध्ये जवळपास २५ प्रजातींची रोपे
जिल्ह्यातील वरखेड, डिघोळ, गंगापिंपरी, करजखेडा, पोहंडूळ, खोकलेवाडी, सोनखेड, चुडावा, फुलकळस, अकोली, भिलज या १२ रोपवाटीकांमध्ये जवळपास २५ प्रजातींची रोपे उपलब्ध आहेत.