परभणी(Parbhani) :- सेलू तालुक्यातील रवळगाव येथील ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी साडीच्या नखीच्या साह्याने पत्राच्या लोखंडी अडूस गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना गुरुवार २६सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे.
भारतीय न्याय संहिता अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील रवळगाव येथीलं रमेश दिनकरराव ढोके वय ३६ वर्षे या तरुणाने घरचे सर्वजण पित्र जेवण्यासाठी गेले असता त्याला असलेल्या दारूच्या नशेमुळे नशेतच राहत्या घरी पत्राच्या खाली असलेल्या लोखंडाच्या अडूला साडीच्या नखीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवार २६सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ उघडकीस आलेल्या या घटनेची माहिती पोलीसांना कळताच बीट जमादार ज्ञानेश्वर जानगर, पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात (Hospital)आणण्यात आले. देऊळगाव गात येथील आरोग्य केंद्राचे(Health Centers) वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविच्छेदन (Autopsy)केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दिनकर ढोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलु पोलीस ठाण्यात कलम १९४ भारतीय न्याय संहिता अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.