परभणी/पाथरी(Parbhani):- विधानसभा निवडणुकीमध्ये निर्मलाताई गवळी विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस(Nationalist Congress) पक्ष अजित पवार गटाकडून राकाँ महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार(Agricultural produce market) समितीच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
राकाँ महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राकाँ युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांची उपस्थिती
सोमवार २८ऑक्टोबर रोजी दुपारी २ वा सुमारास महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार निर्मलाताई विटेकर यांचा उमेदवारी अर्ज रॅली काढत दाखल करण्यात आला . यावेळी राकाँ कडून मोठे शक्ती प्रदर्शन दाखवण्यात आले . प्रारंभी दुपारी १२ वा . बाजार समिती प्रागंणात सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मंचावर राकाँ महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर , राकाँ युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण , आ .राजेश विटेकर , मा.आ. हरिभाऊ लहाने , निर्मलाताई विटेकर , भाजपा प्रदेश प्रवक्ता डॉ. उमेश देशमुख, राकाँ जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, अनिलराव नखाते , प्रताप देशमुख , चंद्रकांत राठोड , भाजपाचे विलास बाबर , पांडुरंग नखाते आदींची उपस्थिती होती. सभेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत रॅली काढण्यात आली होती. ही रॅली राष्ट्रीय महामार्गावरून जात छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती.
दरम्यान पाथरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात निर्मलाताई विटेकर यांच्या ऐवजी आमदार राजेश विटेकर हेच उभे असतील एकूण चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यातून दिसून येत आहे . राजकीय सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे .